Ad will apear here
Next
जीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी
प्रातिनिधिक फोटोपालघर : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता पालघर जिल्ह्याला तिसरा क्रमांक मिळाल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे.

केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यरत आहे. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास खात्यामार्फत पंतप्रधान गृहनिर्माण योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवानोन्नती अभियान राबवले जाते. याअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार दिले जातात. या वर्षी पहिल्या क्रमांकावर सातारा, पुणे, धुळे, नागपूर, हिंगोली आणि औरंगाबाद, तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली जिल्हा आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी तेथील गरिबांना एकत्र आणून, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे, संस्थेमार्फत गरिबांना वित्तीय सेवा पुरवणे, गरिबांची व त्यांच्या संस्थेची क्षमतावृद्धी व कौशल्यवृद्धी करणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून त्यांना दारिद्र्यनिवारणास मदत करणे, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZIZBC
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
उष्म्यातून थोडासा दिलासा पुणे : सध्या देशासह राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे नागरिक कमालीच्या उकाड्याने हैराण झाले आहेत मात्र आगामी एक-दोन दिवसांत विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागांत तापमान काहीसे घटण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  मध्य महाराष्ट्र व विदर्भात
गडचिरोली जिल्ह्यात मोफत मदत केंद्राचे उद्घाटन गडचिरोली : जिल्ह्यात समतादूतामार्फत ‘राइट टू एज्युकेशन’ (आरटीई) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन पाच मार्च २०१९ रोजी गोकुळनगर येथील अंगणवाडीत करण्यात आले.
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language